There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
पर्सनल ब्रॅंडिंग मध्ये सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्रत्येकास हे माहित आहे, परंतु तरीही अद्याप असे बरेच प्रश्न आहेत. विशेषत: आजकाल जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्म इतक्या वेगात वाढत आहे आणि स्पर्धा पूर्वी पेक्षा अधिक मजबूत होत आहेत, तरीही सर्वांना पर्सनल ब्रॅण्डिंग म्हणजे काय? हा प्रश्न असतोच.
सोशल मीडिया हे एक विरंगुळ्याचे आणि मित्र-मैत्रिणीं सोबत संपर्कात राहण्यासाठी चांगले माध्यम आहे. पण आज सोशल मीडिया हे मार्केटिंग चं एक खूप मोठं प्लॅटफॉर्म बनलेलं आहे. जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शी निगडित कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर सोशल मीडिया वर चांगला प्रेझेन्स असणे खूप गरजेचे आहे हे तुम्हाला माहिती आहे.
लिंक्डइन हे विशेषज्ञांसाठी (specialist) एक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये युझर्स चे संपूर्ण प्रोफाइल, त्यांचा अनुभव, त्यांच्या achievements व success stories इत्यादी गोष्टी चा समावेश असतो. परंतु यात डिस्कशन ग्रुप्स आणि professionals नि तयार केलेले ब्लॉगस पण आहेत. कारण बिझनेस – ओरिएंटेड स्वभावामुळेच लिंक्डइन हा एक मुख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून – तुमच्या पर्सनल ब्रॅण्डिंग ला तयार करण्यासाठी आणि पुढे घेऊन जाण्यासाठी वापरला जातो.
Professionals त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलला अपडेटेड ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि फेसबुक आणि ट्विटरची शक्ती आणि क्षमता विसरतात. ते त्यांना सोशल मीडिया चॅनेल्स सारखे वापरतात फक्त त्यांच्या प्रायवेट कामासाठी किंवा एंटरटेनमेंट च्या उद्देशाने. परंतु सत्य हे आहे कि दोन्ही प्लॅटफॉर्म्स अत्यंत महत्त्वाचे आहेत इंटरनेट वर त्या सर्व professionals ची ओळख तयार करण्यासाठी.
दररोज लाखो युझर्स फेसबुक आणि ट्विटरवर लॉग इन करतात, इथेच तुम्हाला तुमचे profile व तुमचा पर्सनल ब्रँड त्या लाखो युझर्स ला दाखविण्याची संधी उपलब्ध होते. परंतु या प्लॅटफॉर्मवर तुमचे पर्सनल ब्रॅण्डिंग झाले नसल्यास, किंवा इथे तुमचा presence किरकोळ असल्यास तुम्ही एक चांगली संधी गमावता. तुम्ही एक आकषर्क प्रोफाइल तयार केले पाहिजे जे तुमच्या बद्दल, तुमच्या प्रोफेशन बद्दल, आणि तुमच्या achievements बद्दल सर्व काही सांगते.
फेसबुक आणि ट्विटरवर दोन्ही प्लॅटफॉर्म पर्सनल ब्रँड तयार करण्यात उत्कृष्ट भूमिका बजावू शकतात. परंतु त्यांना नियमितपणे अपडेट करत राहणे अत्यंत महत्वाचे आहे. युझर्स ला कसा फायदा होऊ शकतो हा विचार करून त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजि तयार करून आमलात आणण्याची गरज आहे.
सगळ्यात महत्वाचे सोशल मीडिया वर, मग तो कुठलाही प्लॅटफॉर्म असो, सुरवातीची संपूर्ण माहिती भरणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ: नाव, ऍड्रेस, फोन (NAP ), तुमच्या बद्दल चे शॉर्ट डिस्क्रिप्शन, प्रोफाइल फोटो, कव्हर फोटो (ज्याला हेडर सुद्धा म्हणतात), कॅटेगीरी, लोकेशन, इत्यादी.
सोशल मीडिया वर अपूर्ण प्रोफाईल असण्यापेक्षा कोणतंच प्रोफाईल असू नये. तुमच्या पर्सनल ब्रॅंडिंग साठी तुमचा प्रोफाईल ही एक पहिली प्रक्रिया (प्रोसेस) आहे. म्हणून एक छान प्रोफाइल बनवण्यासाठी थोडा वेळ घ्या.
तुमच्या प्रोफाइल चं इंट्रोडक्शन संक्षिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यानी युझर्स ला ते वाचल्या नंतर तुमच्या बद्दल समजू शकेल. याच बरोबर तुमच्या इंट्रोडकशन मधे तुमची पर्सनॅलिटी दिसली पाहिजे. आणि युझर्स ला हे पण लक्षात आलं पाहिजे कि तुम्हाला फॉलो केल्याने त्यांना काय फायदा होईल.
उदाहरणार्थ :
तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी किंवा गोल्स च्या आधारावर एक पर्सनल आणि एक प्रोफेशनल पेज बनवू शकता. पण खालील गोष्टी लक्षात ठेवा :
तुमचा प्रोफाइल picture चा तुमच्या ब्रॅण्डिंग मधे सर्वात महत्वाचा रोल आहे. तुम्ही प्रोफाइल पिक्चर वर मेहनत घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्याला तुमच्या डेस्कटॉप वर प्रोफाइल फोटो या नावाने सेव करून ठेवा. तुमचा एक चांगला फोटो वापरण्याच कारण हे आहे कि सोशल मीडिया वर लोक तुमच्या नावापेक्षा तुमच्या फोटो नी तुम्हाला जास्त लक्षात ठेवतात. तुम्ही एकच प्रोफाइल फोटो प्रत्येक प्लॅटफॉर्म वर वापरला पाहिजे. असं केल्याने तुमच्या पर्सनल ब्रँड आणि प्रेझेन्स वर चांगला प्रभाव पडतो.
जर वेग-वेगळ्या फोटो चा वापर केला तर लोकांना तुम्हाला आणि तुमचा ब्रँड ला लक्षात ठेवणे कठीण होऊन जाते. ते टाळण्यासाठी तुमचा एकच फोटो सगळ्या प्लॅटफॉर्म वर असणे गरजेचे आहे.
सोशल मीडिया साईट्स ची एक लिस्ट बनवा :
इंटरनेट वर बऱ्याच सोशल मीडिया साईट्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा ऑनलाइन प्रेझेन्स बनवू शकता. पण अश्या काहीच साईट्स आहेत जिथे तुम्ही रोज ऍक्टिव्ह राहता.
उदाहरणार्थ : समजा तुमचा प्रोफाइल या साईट्स वर आहे
पण तुम्ही या वर दिलेल्या साईट्स वर रेअरली ऍक्टिव्ह राहता?
आणि या खालील साईट्स वर बरेच ऍक्टिव्ह राहता :
म्ह्णून तुम्हाला त्याच साईट्स ची लिस्ट बनवायला पाहिजे ज्याच्यावर तुम्ही दिवसभऱ्यातून कमीत कमी एकदा तरी ऍक्टिव्ह असता.
तुमच्या ऑनलाइन प्रेझेन्स च्या quality ला मेंटेन करा :
पहिल्याच दिवसापासून तुमच्या quality ला मेंटेन करणे सुरु करा. जर तुम्ही चांगला प्रेझेन्स ठेवला तर भविष्यात तुमचा चांगला आणि स्वच्छ ऑनलाइन फूटप्रिंट तयार होईल. जर तुम्ही खूपच चांगलं काम कराल तर युझर्स तुम्हाला आपोआप फॉलो करतील.
तुमच्या achievements बद्दल सांगा :
जेव्हा तुम्ही काही नवीन करता किंवा काही achieve करता तर त्याला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर न विसरता शेअर करा. कारण कि जे युझर्स तुमच्या सोबत कनेक्टेड असतात त्यांना तुमच्या achievements बद्दल माहिती करून घेण्याची बरीच उत्सुकता असते. achievements शेअर केल्याने तुमच्या subscribers वर पण एक चांगला इफेक्ट निर्माण होतो.
काही टिप्स :
टिप १. तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवावं लागेल कि पर्सनल ब्रॅंडिंग one-shot-deal नाही आहे, उलट हि एक continuous प्रोसेस आहे.
टिप २. तुमच्या स्ट्रॅटेजि आणि ideas ला वेळे नुसार चेंज करत राहा.
टिप ३. सोशल मीडिया टूल्स च advantage घ्या. हे टूल्स तुम्हाला पर्सनल ब्रॅंडिंग गोल्स achieve करण्यात मदत करतील.
टिप ४. नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या कि तुमचे idea युनिक असले पाहिजे. आणि त्यांना तुमच्या followers सोबत पण शेअर करा म्हणजेच ते पण त्याचा फायदा घेऊ शकतील.
टिप ५ . जेव्हा तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर काही अपडेट किंवा पोस्ट करायचे असेल तर hashtag (#) चा वापर करा. असं केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.
असे म्हणतात कि प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने कुठले ना कुठले तरी विशेष कौशल्य (युनिक स्किल) देऊन पाठवले आहे… त्या विशेष कौशल्याला God Given Gift म्हणतात.
माझा निष्कर्ष : या सगळ्या पद्धतींना तुम्ही follow कराल तर तुमची पर्सनल ब्रॅण्डिंग खूपच चांगली होऊन जाईल आणि तुम्ही हळू-हळू फेमस होऊन जाणार. मला आशा आहे की सोशल मीडिया वापरून स्वतः चे ब्रॅण्डिंग कश्या पद्धतीने करायचे याचे विविध पैलू समजले असाल. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया खाली आपल्या टिप्पण्या द्या.